Akshay Nirmale
अभिनेत्री सारा अली खान ही बॉलीवूडमधील एक बिनधास्त हीरोईन आहे. ती तिचे आयुष्य अगदी मस्त, कुणाचीही पर्वा न करता जगते.
नुकतेच सारा अली खान आणि अनन्या पांडे या दोघी अभिनेत्री करन जोहरच्या कॉफी विथ करन या टॉक शोमध्ये येऊन गेल्या.
स्वभावाला अनुसरून साराने या एपिसोडमध्ये तिला विचारलेल्या प्रश्नांवर बिनधास्त उत्तरे दिली.
करनने तिला मुद्दामहून क्रिकेटपटू शुबमन गिलसोबतच्या नात्यावर प्रश्न विचारला. तेव्हा तीने तुम्ही चुकीच्या साराला प्रश्न विचारला आहात, असे प्रत्युत्तर दिले.
सारा आणि शुबमन अनेकदा एकत्र दिसले आहेत. रेस्टॉरंट तसेच विमान प्रवासातही दोघे एकत्र दिसले होते. त्यावरून दोघांच्या अफेयरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
याशिवाय शुबमनचे नाव सारा तेंडुलकरशीही जोडले गेले होते. त्यामुळेच ती सारा मी नाही, असे उत्तर सारा अली खानने करनला दिले.
दरम्यान, साराची आजी शर्मिला टागोर यांनी मन्सूर अली खान पतौडी या क्रिकेटपटूशीच लग्न केले होते. तर साराची आई अमृता सिंग यांचे क्रिकेटर रवी शास्त्रीसोबतचे अफेयर गाजले होते.