Sameer Amunekar
गोव्यातील नार्वे–डिचोली येथे स्थित असलेले सप्तकोटेश्वर मंदिर हे गोव्याच्या धार्मिक इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे मंदिर आहे.
या मंदिराचा जीर्णोद्धार स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांनी केल्याची ऐतिहासिक नोंद आढळते.
पोर्तुगीज सत्ताकाळात अनेक हिंदू मंदिरांप्रमाणे या मंदिराचीही तोडफोड करण्यात आली होती.
सुमारे 1668 च्या काळात शिवाजी महाराजांनी नार्वे येथे सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून ते पुन्हा उभं केलं.
मंदिराचा पुनर्जन्म म्हणजे केवळ बांधकाम नव्हे, तर हिंदू धर्म, संस्कृती आणि स्वाभिमानाचं प्रतीक मानलं जातं.
या मंदिराच्या रचनेत भारतीय परंपरा आणि पोर्तुगीज स्थापत्यशैलीचा सुंदर संगम दिसून येतो.
आजही हे मंदिर भाविकांसाठी श्रद्धास्थान असून, शिवरायांच्या गोव्यातील पराक्रमाची साक्ष देत उभं आहे.