Akshata Chhatre
प्रत्येकाच्या घरात हमखास असणारा मसाल्याचा पदार्थ म्हणजे वेलची.
वेलची जेवढी स्वादिष्ट आणि सुगंधी असते तेवढीच गुणकारी देखील असते. वेलचीचे दोन प्रकार असतात आणि दोन्ही प्रकारांचा वापर औषधात केला जातो.
वेलची चवीने तिखट आणि पचायला हलकी असते, वेलचीमुळे कफदोष तसेच वातदोष कमी व्हायला मदत मिळते.
दमा, खोका, मूळव्याध, लघवी अडखळत होणे यावर वेलची गुणकारी ठरते.
जिभेवर थर तयार होणे, किंवा तोंडाला दुर्गंध येत असल्यास वेलचीचा वापर केला जातो.
कोरडा खोकला येत असल्यास दोन-तीन चमचे वेलचीचे चूर्ण तूप किंवा लोण्यासोबत खावं.
वेलची गुणकारी असली तरीही अति प्रमाणात सेवन केल्याने त्रास होऊ शकतात.