Sameer Panditrao
कुंभारजुवे येथील मांडवी नदीच्या पात्रात साजरा होणारा सांगोडोत्सव हजारो रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
हा नयनरम्य देखावा नजरेत भरून घेण्यासाठी नदीच्या दुतर्फा आणि कुंभारजुवे पुलावरही प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.
श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवस्थानातील श्री गणेशमूर्तीला सुशोभित मखरात बसवून, सनई-ताशांच्या तालात आणि आतषबाजीत मिरवणूक तारीवाड्याच्या दिशेने निघाली.
गावातील गणपतीही तारीवाडा (माशेल) येथे नदीकिनारी पोचले होते.
नदीच्या पात्रात सांगोड उत्सवाला सुरवात झाली.
सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक अशा विविध विषयांवरील सुमारे 24 वेगवेगळे देखावे असलेले चित्ररथ नदीच्या पात्रातील सांगोडमध्ये होते.
नदीत विहार करणाऱ्या सांगोडमधील हे आगळेवेगळे देखावे आबालवृद्धांना रोमांचित करत होते. संध्याकाळचा हा देखणा नजारा अनेकांच्या मोबाईलमध्येही कैद होत होता.