Sangodotsav: शेकडो वर्षांची परंपरा असणारा कुंभारजुवेतील 'सांगोडोत्सव' उत्साहात साजरा!

Manish Jadhav

सांगोडोत्सव

मांडवी नदीच्या पात्रातील कुंभारजुवे गावात दरवर्षी मोठ्या उत्साहात 'सांगोडोत्सव' साजरा केला जातो.

Sangod Utsav | Dainik Gomantak

श्री शांतादुर्गा

श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवीच्या प्राकारात साजरा होणार्‍या गणेशोत्सवाचा तो अविभाज्य भाग मानला जातो.

Sangod Utsav | Dainik Gomantak

मोठा उत्साह

यंदा मंगळवारी (2 सप्टेंबर) कुंभारजुवेतील मांडवी नदीच्या पात्रात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.

Sangod Utsav | Dainik Gomantak

ऐतिहासिक देखावे

या उत्सवात सजवलेल्या होड्यांवर (सांगोड) पौराणिक, सामाजिक आणि ऐतिहासिक घटनांचे देखावे सादर केले.

Sangod Utsav | Dainik Gomantak

स्थानिक कलाकार

तसेच, दिवे, सजावट, नृत्य-गीत आणि नाट्यरुपे यांच्या संगमामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने उजळून निघाला. स्थानिक कलाकार, महिला-पुरुष आणि लहान मुलांनी या देखाव्यात सहभागी घेतला.

Sangod Utsav | Dainik Gomantak

चित्ररथ

या उत्सवाच्या निमित्ताने विविध विषयांवर आधारुन तयार केलेल्या चित्ररथांनी मांडवी नदीचे पात्र व्यापून टाकले. हे चित्ररथ बनवण्यासाठी या परिसरातील कलाकारांनी अनेक दिवस काम केले.

Sangod Utsav | Dainik Gomantak

गणेश विसर्जन

गणेश विसर्जनाच्या वेळी केला जाणारा शांतादुर्गा कुंभाराजुवेकरीणीचा हा सांगोडोत्सव गोमंतकामध्ये प्रसिद्ध आहे.

Sangod Utsav | Dainik Gomantak

शेकडो वर्षांची परंपरा

कुंभारजुवे गावातील सात दिवसांच्या या परंपरागत सांगोड उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे.

Sangod Utsav | Dainik Gomantak

Ajinkyatara Fort: साताऱ्याचा मुकुटमणी! महाराणी ताराराणींच्या पराक्रमाची गाथा सांगणारा 'अजिंक्यतारा किल्ला'

आणखी बघा