Manish Jadhav
सॅमसंग मार्केटमध्ये लवकरच मोठा धमाका करणार आहे.
कंपनी लवकरच भारतात Galaxy A35 चा उसक्सेसर मॉडेल Galaxy A36 लॉन्च करु शकते.
Samsung Galaxy A36 या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला अनेक अफलातून फिचर्स मिळणार आहेत. विशेष म्हणजे, हा शानदार फोन परवडणाऱ्या बजेटमध्ये असणार आहे.
हा स्मार्टफोन सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट करण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए36 ची झलक ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस) प्लॅटफॉर्मवर देखील पाहण्यात आली आहे.
सॅमसंगच्या Galaxy A36 या आगामी स्मार्टफोनची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाहीये.
सॅमसंग गॅलेक्सी ए36 मध्ये फोटो-व्हिडिओग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध असू शकतो. बॅक रियरला असलेला प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा असू शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंट 12-मेगापिक्सेल कॅमेरा मिळू शकतो.
सॅमसंग गॅलेक्सी ए36 मध्ये तुम्हाला शानदार बॅटरी बॅकअप मिळू शकतो. हा फोन फास्ट चार्जिंग सपोर्टसह येऊ शकतो. तसेच, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 2 एसओसी चिपसेट किंवा स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 एसओसी चिपसेट या स्मार्टफोनमध्ये असू शकते.