गोमन्तक डिजिटल टीम
छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे भोसले यांच्याविषयी आज आपण माहिती जाणून घेऊ.
संभाजी राजेंचा जन्म सन १६२३ मध्ये वेरूळ येथे झाला.
खुद्द मुर्तिजा निजामशाह शहाजी महाराजांच्या पुत्राच्या अर्थात संभाजी राजेंच्या बारशास तेथे हजर होता.
१६३६ साली शहाजी महाराज जेव्हा पुणे प्रांत सोडून कर्नाटकास गेले तेव्हा संभाजी राजे, जिजाबाई व शिवाजी महाराज त्यांच्या सोबत होते.
शहाजी महाराजांनी आपली पुणे जहागीर छत्रपती शिवरायांसाठी तर बंगळूर व कोलार ही जहागीर संभाजी राजे यांना दिली.
१६५५ साली कनकगिरीचा सरदार आपाखान याने आदिलशाहीविरोधात बंडखोरी केली म्हणून त्याचा बीमोड करण्यासाठी अफजलखान आणि संभाजी राजे यांना पाठविण्यात आले.
कनकगिरीवर हल्ल्यावेळी अफजलखानाने लबाडीने संभाजी राजे यांना पुढे पाठवून कपटाने त्यांची हत्या घडवून आणली
संभाजी राजे यांच्या निधनाने शहाजी महाराज दुःखात बुडाले. अफजलखानाने तेंव्हाही भोसले परिवाराला त्रास दिला.
नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करून अदिलशाही साम्राज्याला जबरदस्त धक्का दिला.