Samangad Fort: इंग्रजांना धूळ चारून गडावर भगवा फडकावला! मुंजाजी कदमांच्या पराक्रमानं पावन झालेला 'किल्ले सामानगड'

Sameer Amunekar

सामानगड

कोल्हापूरातील शिवकालीन गड पश्चिम घाटाच्या पूर्वेकडे सह्याद्रीच्या उपरांगेत भीमसासगिरीच्या डोंगरात किल्ले सामानगड आहे.

Samangad Fort | Dainik Gomantak

शिवकालीन गड

हा गड समुद्रसपाटीपासून २,९७२ फूट उंचीवर आग्नेय कोपऱ्यात आहे. गडहिंग्लज तालुक्यातील हा एकमेव शिवकालीन गड आहे.

Samangad Fort | Dainik Gomantak

कदंब राजाच्या राजवटीच्या पाऊलखुणा

२० किलोमीटरचा परीघ असलेल्या सामानगडावर ६५ हेक्टरचे प्रशस्त पठार आहे. कदंब राजाच्या राजवटीच्या पाऊलखुणा सामानगडावर दिसतात. अकराव्या शतकात दुसरा राजा भोज याने हा गड उभारला.

Samangad Fort | Dainik Gomantak

गडाची डागडुजी

किल्ल्याची बांधणी इष्टिका दुर्ग प्रकारात मोडते. १६७४ मध्ये या गडाची डागडुजी झाली.

Samangad Fort | Dainik Gomantak

इंग्रजांविरोधात बंड

१८४४ मध्ये मुंजाजी कदम यांनी इंग्रजांविरोधात बंड उभारून सामानगडावर भगवा फडकाविला, असे उल्लेख आढळतात.

Samangad Fort | Dainik Gomantak

अंधारकोठडी

या गडाचा आकार ओंकार स्वरूपाचा असून, शिवकाळात शत्रूच्या बंदी केलेल्या कैद्यांना ठेवण्यासाठी अंधारकोठडीची व्यवस्था केलेली दिसते.

Samangad Fort | Dainik Gomantak

सात कमान विहीर

सात कमान विहीर देखील पाहण्यासारखी आहे. पावसाळ्यात चार महिने या भागात प्रचंड पाऊस कोसळतो. पर्जन्यवृष्टीमुळे डोंगर-दऱ्या हिरवाईच्या शालूने सजलेल्या असतात.

Samangad Fort | Dainik Gomantak

फुलांचा राजा 'गुलाब' मुलींना का मोहून टाकतो? जाणून घ्या

Why Girls Love Roses | Dainik Gomantak
येथे क्लिक करा