Akshata Chhatre
तुम्हाला कधी कोणी मीठपासून प्रेग्नन्सी टेस्ट कशी करावी हे सांगितलं आहे का? काही महिला गर्भधारणा तपासण्यासाठी मीठाचा वापर करतात. पण यामागचं सत्य काय आहे?
यासाठी युरीन सॅम्पल घेऊन त्यात त्यात थोडं मीठ घातलं जातं. यानंतर मीठ विरघळतं की त्याच्या गुठळ्या बनतात हे पाहिलं जातं. हे बदल हे बदल गर्भधारणेचं लक्षण मानले जातात.
या टेस्टला कोणतीही वैज्ञानिक मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास ठेऊ नये.
वैज्ञानिक दाखला नसल्याने तुम्ही शक्यतो यापासून दूर राहावं. कारण अशा चुकीच्या पद्धतींमधून समोर आलेली माहिती तुमची दिशाभूल करू शकते. यामुळं महिलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
होम प्रेग्नन्सी टेस्ट किट्स, डॉक्टरकडून लॅब टेस्ट्स असे काही वैज्ञानिक दृष्ट्या तपासलेले आणि सुचवलेले पर्याय वापरणं कधीही चांगलं असतं.
मीठाने प्रेग्नन्सी टेस्ट करणे हे एक प्रचलित गैरसमज आहे, त्यामुळे वैद्यकीय सल्ला घेण्यावरच विश्वास ठेवा. कारण सोशल मीडियावर दाखवलेले उपाय नेहमी बरोबर नसतात.