Akshata Chhatre
आपल्याकडे बऱ्याच काळापासून जेवण झाल्याझाल्या विडा खाण्याची जुनी पद्धत आहे. असं म्हणतात विड्याच्या पानामुळे अन्न पचायला मदत होते. पण चुना खाणं काही बरोबर नाही.
तुम्हाला पान खायला आवडत असेल तर चुन्याऐवजी त्यात ओवा टाका. ओव्यामुळे पचनक्रिया आणखीन चांगली होते आणि म्हणूनच अपचन, गॅसेस आणि पोटदुखी सारखे आजार दूर होतात.
विड्याचं पान आणि ओवा नियमितपणे घेतल्यास भूक सुधारते आणि पचनशक्ती वाढते.
ओव्याचे उष्ण गुणधर्म आणि विड्याच्या पानातील अँटीबायोटिक घटक मिळून श्वसनाचे विकार आणि खोकला सुद्धा कमी करतात.
आता तुम्हाला असं वाटेल की विड्याच्या पानाचा फायदा फक्त पोटाच्या आजारांसाठी आहे का? तर तसं नाही. विड्याचं पान आणि ओवा चघळल्याने तोंडातील दुर्गंधी, जंतू आणि हिरड्यांचे आजार कमी होतात.
आपलं शरीर रोज किती टॉक्सिन्स जमा करत असतं याची कल्पना सुद्धा करवत नाही, मात्र हे मिश्रण शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतं आणि म्हणूनच डिटॉक्ससाठी हा नैसर्गिक उपाय आहे.