Manish Jadhav
जर तुम्ही कमी पगारामुळे त्रस्त असाल आणि नोकरी सोडण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा...!
काही स्मार्ट पद्धतींनी तुम्ही तुमच्या पगारात चांगली वाढ मिळवू शकता. वाढत्या महागाईमुळे बऱ्याचदा तुम्हाला वाटत असेल की, इतक्या पगारात घर, मुलांचे शिक्षण कसे भागेल तर चिंता करु नका.
चला तर मग आज (28 मे) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून पगारवाढीसाठी काय केले पाहिजे ते जाणून घेऊया...
पगारवाढीसंदर्भात बॉसशी मोकळेपणाने पण प्रोफेशनली बोलणे महत्त्वाचे असते. तुमचे यश, प्रोजेक्टमधील योगदान आणि कंपनीसाठी तुमची असलेली व्हॅल्यू यावर प्रकाश टाकला पाहिजे.
तुमच्या कामातून कंपनीला काय फायदा झाला हे तुम्ही बॉसला पटवून दिले पाहिजे. पण यासंबंधी बोलताना काळजी घेतली पाहिजे. विशेष म्हणजे, तुम्ही यादरम्यान सकारात्मक राहिले पाहिजे.
आजच्या कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये स्कील हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही डेटा एनालिसिस, डिजिटल मार्केटिंग किंवा एआय टूल्स सारखी नवीन स्कील शिकलात तर कंपनीत तुमची व्हॅल्यू वाढते.
तुम्ही तुमच्या प्रोफेशननुसार कामात काय उपयुक्त ठरु शकते त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.