Pranali Kodre
दुखापतीने त्रस्त
एमएस धोनी आयपीएल 2023 च्या संपूर्ण हंगामात डाव्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होता.
त्यामुळे आयपीएल 2023 नंतर लगेचच मुंबईतील कोकिलाबेन धिरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये त्याच्या गुडघ्यावर डॉक्टर दिनशॉ परदीवाला यांनी शस्त्रक्रिया केली.
सध्या धोनी या शस्त्रक्रियेतून सावरत आहे.
दरम्यान, धोनीच्या प्रोडक्शनच्या लेटस गेट मॅरीड हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला असून त्याच्या प्रमोशनच्या कार्यक्रमात धोनीची पत्नी साक्षी दिसत आहे.
अशाच एका कार्यक्रमाच्या वेळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात ती धोनीच्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेबद्दल अपडेट देत आहे.
साक्षीने सांगितले की 'तो सावरत आहे आणि आत्ता रिहॅबमध्ये (दुखापतीतून सावरण्याची प्रक्रिया) आहे.
साक्षीने दिलेले हे अपडेट ऐकून धोनीचे चाहते मात्र सुखावले आहेत.
दरम्यान, आयपीएल 2023 त्याचा अखेरचा हंगाम आहे का अशा अनेक चर्चा सुरू होत्या. मात्र धोनीने आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यानंतर तो पुढील हंगामातही खेळू शकतो, असे त्याने सांगितले होते.
धोनीने यापूर्वीच 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. पण त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये खेळणे सुरू ठेवले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.