Sameer Amunekar
अहान पांडे आणि अनिता पड्डा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सैयारा’ या चित्रपटाने प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी २१ कोटींचा गल्ला जमवत दमदार सुरुवात केली आहे.
सैयारा चित्रपटाच्या कथानकावर सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. अनेक प्रेक्षकांचा दावा आहे की या चित्रपटाची कथा २००४ मध्ये आलेल्या कोरियन चित्रपट ‘अ मोमेंट टू रिमेंबर’शी मिळतीजुळती आहे.
‘सैयारा’ ही क्रिश कपूर नावाच्या एकट्या, रागीट संगीतकार (अहान पांडे) आणि वाणी नावाच्या शांत, महत्त्वाकांक्षी लेखिका (अनिता पड्डा) यांची प्रेमकथा आहे.
वाणीला अल्झायमरची सुरुवात झाल्यावर त्यांच्या नात्यात वेगळं वळण येतं. अशाच प्रकारची भावनिक प्रेमकहाणी ‘अ मोमेंट टू रिमेंबर’मध्येही पाहायला मिळते आहे.
त्या चित्रपटात सू-जिन आणि चुल-सू यांच्या नात्याला अल्झायमरमुळे आलेली संकटं दाखवली आहेत. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी ‘सैयारा’ आणि ‘अ मोमेंट टू रिमेंबर’ यामधील कथानकाच्या साम्यांवर मत व्यक्त केले आहे.
काहींनी मोहित सुरीवर कोरियन चित्रपटांचे कथानक उचलण्याचा आरोप केला आहे, तर काही चाहत्यांनी म्हटलं की “प्रत्येक प्रेमकथेचा एक भावनिक प्रवास असतो, असं म्हटलंय.
यावर अद्याप निर्मात्यांकडून किंवा दिग्दर्शकांकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. ‘सैयारा’ची कथा संकल्प सदान यांनी लिहिली आहे.