Manish Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आई सईबाई भोसले यांच्याविषयी या वेबस्टोरीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.
साईबाईंचा जन्म 29 ऑक्टोबर 1633 रोजी तर मृत्यू 5 सप्टेंबर 1659 रोजी झाला.
सईबाईंचा जन्म फलटण येथे झाला होता. त्यांचे वडील मुधोजीराजे नाईक निंबाळकर होते.
सईबाईंचा छत्रपती शिवाजी महाराजांशी बालपणीच 16 मे 1640 रोजी लाल महाल, पुणे येथे विवाह झाला होता.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री
सईबाई या छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री होत्या.
सईबाईंच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांचे पालनपोषण जिजाबाई आणि त्यांच्या दूध आईने केले.
सईबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकनिष्ठ पत्नी होत्या आणि त्यांनी स्वराज्याच्या कार्यात मोलाची साथ दिली.