Manish Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात किल्ल्यांना खूप महत्व होते. असाच एक नाशिकमधील साल्हेरचा किल्ला होता.
साल्हेरचा किल्ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील एक महत्वाचा किल्ला आहे.
हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेत असून महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे. याची उंची 5,141 फूट (1,567 मीटर) आहे. साल्हेर आणि सालोटा हे जुळे किल्ले असून ते महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरातच्या सीमेजवळ आहेत.
साल्हेर किल्ला 1672 मध्ये मराठे आणि मुघल यांच्यातील साल्हेरच्या लढाईसाठी प्रसिद्ध आहे, जी मराठ्यांसाठी निर्णायक विजय ठरली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी 1671 मध्ये बागलाण मोहीम राबवली, ज्यामध्ये साल्हेर किल्ला जिंकून घेतला.
किल्ल्यावर गुहा, धान्य कोठारे, मंदिर, दगडी बांधकाम असलेले तलाव आणि स्नानगृहे आहेत.
साल्हेर किल्ल्यावर जाण्यासाठी सटाणा-डांगसौंदाणे-ततानी किंवा ताहाराबाद-मुल्हेर-वाघांबे या मार्गांनी जाता येते.
ट्रेकिंगच्या आवड असणाऱ्या लोकांसाठी साल्हेर किल्ला उत्तम आहे.