Manish Jadhav
आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्स संघाचा सलामीवीर फलंदाज साई सुदर्शनचा जलवा पाहायला मिळत आहे. तो जवळजवळ प्रत्येक सामन्यात आपल्या फलंदाजीची सोडत आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघासाठी टॉप 3 फलंदाज कर्णधार शुभमन गिल, साई सुदर्शन आणि जॉस बटलर जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. यातच आता, केकेआरविरोधात खेळल्या गेलेल्या सामन्यात साईने निकोलस पूरनला मागे सोडत ऑरेंज कॅप मिळवली.
कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यापूर्वी, साई ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी होता. त्याने 7 सामन्यात 364 धावा केल्या होत्या. मात्र कोलाकाता विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात साईने ऑरेंज कॅपवर कब्जा केला.
साईने या सामन्यातही संघाला चांगली सुरुवात करुन दिली. साई 150 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी करत आहे.
साईच्या या शानदार कामगिरीमुळे आता त्याच्यासाठी पुन्हा एकदा टीम इंडियाचे दरवाजे उघडू शकतात. त्याने एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण केले असले तरी त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले होते. आता जर साई अशाच प्रकारे फलंदाजी करत राहिला तर त्याला लवकरच पुन्हा टीम इंडियात स्थान मिळू शकते.
तथापि, आयपीएलमध्ये अजूनही बरेच सामने शिल्लक असून इतर फलंदाजही चांगली कामगिरी करुन ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सुदर्शनला मागे टाकण्याचा प्रयत्न करतील .