Sameer Amunekar
मजबूत पासवर्ड सायबर हल्ल्यांपासून तुमची खाती सुरक्षित ठेवतो. पासवर्डमध्ये सोप्या शब्दांचा किंवा तुमच्या वैयक्तिक माहितीचा (जसे की नाव, जन्मतारीख) वापर करू नका.
तुमच्या सोशल मीडिया, बँकिंग आणि ई-मेल अकाउंटसाठी 2-स्टेप व्हेरिफिकेशन चालू ठेवा. OTP किंवा ऑथेंटिकेटर अॅपद्वारे खात्रीशीर सुरक्षा मिळेल.
अनोळखी ई-मेल किंवा मेसेजमधील लिंक उघडण्यापूर्वी खात्री करा. बँक किंवा सरकारी संस्थेच्या नावाने आलेले फिशिंग ई-मेल टाळा.
फ्री Wi-Fi नेटवर्क हॅकर्ससाठी सोपे लक्ष्य असते. VPN (Virtual Private Network) वापरा.
तुमची प्रोफाईल प्रायव्हसी सेटिंग्स तपासा. लोकेशन, बँकिंग माहिती किंवा खाजगी माहिती शेअर करू नका.
मोबाइल, लॅपटॉप आणि इतर डिव्हाइससाठी अँटीव्हायरस इन्स्टॉल करा. ऑपरेटिंग सिस्टम आणि अॅप्स वेळेवर अपडेट करा.
विश्वासार्ह आणि सुरक्षित वेबसाइट्सवरूनच खरेदी करा. अनोळखी पेमेंट लिंकवर क्लिक करू नका.