Akshata Chhatre
योग्य स्वच्छतेमुळे यीस्ट इन्फेक्शन आणि यूटीआय (UTI) सारख्या वेदनादायक समस्या टाळता येतात. निसर्गतः हा भाग ॲसिडिक असतो, त्याचा समतोल राखणे गरजेचे आहे.
१ चमचा कडुलिंबाची पाने, १ चमचा तुळशीची पाने, १ चमचा हळद आणि १ चमचा जिरे. हे चारही घटक जंतुनाशक म्हणून काम करतात.
एका भांड्यात २ कप पाणी घेऊन त्यात सर्व साहित्य टाका. पाणी उकळून १ कप होईपर्यंत आटवा. नंतर गाळून थंड होऊ द्या.
या पाण्याचा वापर फक्त बाहेरील भागाच्या स्वच्छतेसाठी करा. दिवसातून फक्त एकदाच आणि अतिशय हलक्या हाताने याचा वापर करावा.
हा काढा खाज आणि दुर्गंधी कमी करतो, जळजळ शांत करतो आणि त्वचेचा नैसर्गिक पीएच राखण्यास मदत करतो.
प्रेग्नेंसी किंवा पिरीयड्स दरम्यान हा प्रयोग टाळावा. तसेच, या काढ्याचा अंतर्गत वापर करू नये, तो केवळ बाह्य स्वच्छतेसाठी आहे.
योनीमार्गातील संसर्ग गर्भाशय आणि फेलोपियन ट्यूबवर परिणाम करू शकतो. त्यामुळे योग्य वेळी घेतलेली काळजी भविष्यातील मातृत्वासाठीही फायदेशीर ठरते.