Akshata Chhatre
क्रिकेटमधील दिग्गज सचिन तेंडुलकर मैदानावर कितीही तणाव असला तरी शांत आणि एकाग्र राहायचा. त्यांची ही विशेषता केवळ खेळासाठीच नाही तर दैनंदिन जीवनातही उपयुक्त ठरू शकते. चला, सचिनसारखे शांत राहण्याच्या काही प्रभावी टिप्स जाणून घेऊया!
सचिन कधीही भावनांच्या आहारी जात नाही. यश असो वा अपयश, तो नेहमी स्वतःला स्थिर आणि संतुलित ठेवतो. संयम ठेवल्यास निर्णय घेणे सोपे होते आणि मानसिक तणाव कमी होतो.
सचिन नेहमी खेळावर लक्ष केंद्रित करतो, बाहेरील गोंधळाकडे दुर्लक्ष करतो. ध्यान आणि श्वासावर नियंत्रण ठेवणे हे एकाग्रता वाढवण्याचे उत्तम उपाय आहेत.
सचिन नेहमी म्हणतो, “नेट प्रॅक्टिस जितकी चांगली, तितका सामना सोपा!” जीवनातील कोणतेही संकट किंवा आव्हान सहज हाताळण्यासाठी तयारी महत्त्वाची असते.
मैदानावर असताना तो समालोचकांच्या टीकेकडे किंवा प्रतिस्पर्ध्यांच्या स्लेजिंगकडे दुर्लक्ष करायचे. आपणही आयुष्यातील नकारात्मक विचार आणि लोकांकडे दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे.
सचिन मोठ्या सामन्यांमध्येही तणावाखाली येत नाहीत, कारण तो स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवतो. मानसिक तणाव कमी करण्यासाठी सकारात्मक विचार, योग्य तयारी आणि आत्मविश्वास ठेवा.