सचिन तेंडुलकरने पहिल्या सामन्यात किती धावा केलेल्या माहित आहे का?

Pranali Kodre

महान खेळाडू

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटमधील महान क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो.

Sachin Tendulkar | X

पदार्पण

त्याने 34 वर्षांपूर्वी 15 नोव्हेंबर 1989 रोजी कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले होते.

Sachin Tendulkar | X

पहिला सामना

त्याने भारताकडून पाकिस्तानविरुद्ध कराची येथे पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. या सामन्यात सचिन अवघा 16 वर्षांचा होता.

Sachin Tendulkar | X

धावा

त्या सामन्यात सचिनने पहिल्या डावात 15 धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

Sachin Tendulkar | X

24 वर्षे कारकिर्द

या सामन्यानंतर सचिनने तब्बल 24 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. त्याने नोव्हेंबर 2013 मध्ये निवृत्ती घेतली.

Sachin Tendulkar | Dainik Gomantak

मास्टर - ब्लास्टर

सचिनने त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विश्वविक्रमांना गवसणी घातली, त्यामुळे त्याला मास्टर-ब्लास्टर म्हणूनही ओळखले गेले.

Sachin Tendulkar | Dainik Gomantak

आंतरराष्ट्रीय कारकिर्द

सचिनने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारताकडून 664 सामने खेळताना सर्वाधिक 34357 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 100 शतकांचा आणि 164 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच सचिनने 201 विकेट्सही घेतल्या आहेत.

Sachin Tendulkar

विश्वविक्रम

तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा, सर्वाधिक धावा करणारा आणि सर्वाधिक शतके करणाराही खेळाडू आहे.

Sachin Tendulkar | Dainik Gomantak

World Cup 2023: आता रंगणार सेमी-फायनलचा थरार

World Cup 2023