Pranali Kodre
भारतात 13 वा वनडे वर्ल्डकप स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीतील 45 सामने पूर्ण झाले आहेत.
आता उपांत्य फेरी आणि अंतिम सामना बाकी आहे. भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या चार संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
गुणतालिकेत पहिल्या आणि चौथ्या क्रमांकावर असेलल्या भारत आणि न्यूझीलंड या दोन संघात पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.
गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी कोलकातामधील ईडन गार्डन्सवर रंगणार आहे.
उपांत्य फेरीतील दोन्ही सामन्यांना भारतीय प्रमाणवेळानुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे.
उपांत्य फेरीत विजय मिळणारे संघ 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामन्यात आमने-सामने असतील.
भारताने साखळी फेरीत 9 पैकी 9 सामने जिंकले आहेत.
न्यूझीलंडने साखळी फेरीतील 9 सामन्यांतील 5 सामन्यांत विजय मिळवला, तर 4 सामने पराभूत झाले आहेत.
ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीतील 9 सामन्यांतील 7 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर 2 सामने पराभूत झाले आहेत.
दक्षिण आफ्रिकेने साखळी फेरीतील 9 सामन्यांतील 7 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर 2 सामने पराभूत झाले आहेत.