Sameer Panditrao
रशियाने कोणत्याही संरक्षणप्रणालीस भेदू शकणाऱ्या ‘बुरेवस्तनिक-९एम७३९’ या अणुऊर्जेवरील क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
रशियाने या माध्यमातून पाश्चिमात्य देशांना सूचक इशारा दिल्याचे मानले जाते.
अशा प्रकारचे शस्त्र जगातील कोणत्याही देशाकडे नसल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला आहे.
हवाई संरक्षणप्रणाली हे क्षेपणास्त्र रोखू शकत नाही. सामान्य इंधनाऐवजी न्यूक्लिअर रिअॅक्टरचा वापर केला जातो.
अँटी-डिफेन्स सिस्टिमला हे क्षेपणास्त्र चकवा देऊ शकते
हे क्षेपणास्त्र उड्डाणादरम्यान सातत्याने मार्ग बदलण्याची क्षमता बाळगते.
या क्षेपणास्त्राला तज्ज्ञांनी आक्षेप घेतला असून ही मिसाईल म्हणजे उडते चेर्नोबिल असल्याचे म्हटले आहे.