Manish Jadhav
रॉयल एनफील्ड आपली सर्वात शक्तिशाली बाईक हिमालयन 750 यावर्षी EICMA शोमध्ये सादर करेल अशी शक्यता आहे. या बाईकची अनेकवेळा परदेशात चाचणी घेतली गेली आहे.
कंपनी 'हिमालयन 750' सोबतच कॉन्टिनेंटल जीटी 750 हे दुसरे मॉडेल देखील लॉन्च करु शकते.
नवीन हिमालयन 750 मध्ये 750 सीसी क्षमतेचे इंजिन असण्याची शक्यता आहे. हे इंजिन रॉयल एनफील्डच्या 650 सीसी इंजिनचे अद्ययावत व्हर्जन असेल.
या नवीन इंजिनमधून 50 बीएचपी (BHP) पॉवर आणि 60 एनएम (NM) टॉर्क निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे बाईकला जबरदस्त ताकद मिळेल.
बाईकची स्थिरता आणि नियंत्रण वाढवण्यासाठी यात पुढच्या बाजूला अपसाइड-डाऊन (USD) फोर्क आणि मागच्या बाजूला मोनोशॉक सस्पेन्शन युनिट्स असतील. हे दोन्ही युनिट्स ॲडजस्टेबल असण्याची शक्यता आहे.
बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन आणि क्रूझ कंट्रोलसारख्या आधुनिक सुविधांसह टीएफटी (TFT) डिस्प्ले देखील असण्याची शक्यता आहे.
या बाईकमध्ये एक मजबूत नवीन फ्रेम आणि सब-फ्रेम असेल, ज्यामुळे रायडिंगचा अनुभव अधिक चांगला होईल. यात ट्यूबलेस टायर्ससोबत 19 इंचचे पुढचे चाक असेल.
कंपनीने अद्याप बाईकच्या किमतीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, पण बाजारातील अंदाजानुसार या बाईकची किंमत सुमारे 4 लाख रुपये (एक्स-शोरुम) असू शकते.