Manish Jadhav
भारतीय मार्केटमध्ये 350 सीसी मोटारसायकल सेगमेंटची लोकप्रियता अजूनही कायम आहे.
विशेषतः मे 2025 मध्ये या सेगमेंटच्या विक्रीने पुन्हा एकदा सिद्ध केले की भारतीय ग्राहकांना या श्रेणीतील बाइक्स खूप आवडतात.
मे महिन्यात रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ने विक्रीच्या बाबतीत आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले. क्लासिक 350 च्या 28,628 युनिट्सची विक्री झाली, जी गेल्या वर्षीच्या मे 2024 च्या तुलनेत 20.39 टक्केची वार्षिक वाढ दर्शवते. त्यावेळी त्याची विक्री 23,779 युनिट्स होती.
तसेच, रॉयल एनफील्ड बुलेट 350 ने 17,279 युनिट्सच्या विक्रीसह दुसरे स्थान पटकावले, जी 85.16 टक्क्यांची मोठी वाढ दर्शवते. हे मॉडेल त्याच्या मजबूत परफॉर्मन्स आणि आयकॉनिक लूकमुळे अजूनही ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे.
याशिवाय, हंटर 350 तिसऱ्या स्थानी आहे, जिच्या मे 2025 मध्ये 15,972 युनिट्स विकल्या गेल्या. ज्यामध्ये 5.89 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली गेली.
रॉयल एनफील्डनंतर मेटीओर 350 चौथ्या स्थानी आहे, जिच्या या महिन्यात 7,697 युनिट्स विकल्या गेल्या. तथापि, या विक्रीत 6.1 टक्क्यांची घट नोंदवली गेली.