Sameer Amunekar
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल 2025 (IPL 2025) साठी आपला नवीन कर्णधार जाहीर केला आहे.
आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला केलं जाऊ शकते असे मानले जात होते. मात्र, संघाची कमान रजत पाटीदार याच्याकडे सोपवली आहे.
गेल्या दोन हंगामात आरसीबीकडून खेळताना रजतची कामगिरी चांगली राहिली आहे.
रजतला देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश संघाला सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या अंतिम फेरीत नेले होते.
आयपीएलच्या गेल्या हंगामात, रजतने 15 सामन्यांमध्ये 177 च्या स्ट्राईक रेटने 395 धावा केल्या होत्या.
विराट कोहलीने सोशल मिडियावर पोस्ट करत रजत पाटीदारला कर्णधारपदी निवडल्याबद्दल अभिनंदन केलं.
आयपीएलमध्ये आरसीबीला आतार्यंत एकही ट्रॉफी जिंकता आली नाहीय. युवा रजत पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबी ट्रॉफी जिंकणार का? याकडे चाहत्यांच्या नजरा असतील.