गोमन्तक डिजिटल टीम
चांगले आरोग्य आणि महिलांचे आरोग्य तसेच शिक्षण याबाबतीत जनजागृती करण्यासाठी रेन रन मॅरेथॉन गोव्यात आयोजित केली जाते.
रोटरी क्लब आयोजित रेन रन इव्हेंटचे हे दहावे वर्ष आहे. २०१५ साली याची सुरुवात झाली होती.
जुलै महिन्यातील शेवटच्या रविवारी याचे आयोजन केले जाते. २ किमी ते २१ किमी पर्यंतच्या मॅरेथॉन रेसमध्ये लोक सहभाग घेतात.
निसर्गरम्य मार्गावर होणाऱ्या या मॅरेथॉनला देशभरातून प्रतिसाद मिळतो. या मॅरेथॉनमध्ये आवर्जून सहभागी झालेल्या विक्रमी महिलांविषयी आपण जाणून घेऊ.
सप्टेंबर २०१८ मध्ये साडी घालून मॅरेथॉन पूर्ण केल्याबद्दल गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या क्रांती साळवी या रेन रेसच्या उद्देशांना पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाल्या आहेत.
सायकलिंगमध्ये पाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंद असणाऱ्या प्रीती मस्के या गोवा आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी पहिल्यांदाच या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत.
गोव्यावरील प्रेमापोटी ३ वेळा आयर्नमॅन गोवामध्ये भाग घेणारी कोरिना व्हॅन डॅम ही विक्रमी धावपटू, क्रीडा प्रशिक्षक पहिल्यांदा हे मॅरेथॉन पूर्ण करणार आहे.
गोवन 'तनिषा' ऑलिंपिक गाजवणार