गोमन्तक डिजिटल टीम
ऑलिम्पिक पदक विजेते टेनिसपटू लिएंडर पेसनंतर पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये गोवन मूळ असलेली आणखी एक ऍथलीट तिचे पहिले ऑलिम्पिक खेळत आहे.
२१ वर्षीय तनिषा क्रास्टोचा जन्म दुबईमध्ये झाला आहे. तीचे वडील गोव्यातील असोळणा या गावचे आहेत.
अनुभवी अश्विनी पोनप्पासोबत बॅडमिंटन महिला दुहेरी स्पर्धेत ती भाग घेणार आहे. अश्विनी पोनप्पा तीच्या कारकिर्दीतले तिसरे ऑलिम्पिक खेळण्यासाठी सज्ज आहे.
ऑलिम्पिकसारख्या भव्य मंचावर तनिषा पदार्पण करत असताना ती स्वत:चे स्वप्न पूर्ण करत असल्याचा आम्हाला आनंद आहे असे तनिषाच्या परिवाराने सांगितले.
आम्ही पॅरिसमध्ये भारताचा जयजयकार करू आणि तनिषा तसेच अश्विनी यांना प्रोत्साहन देऊ असे तिच्या वडिलांनी सांगितले. त्यांचा जन्म मडगावचा आहे.
जागतिक क्रमवारीत १९ व्या स्थानावर असलेल्या तनिषा आणि अश्विनी क गटात आहेत आणि त्यांना दोन कठीण लढतींचा सामना करावा लागेल.
१९४८च्या लंडन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघात चार गोवन खेळाडू होते. वैयक्तिकमध्ये ॲथलेटिक्स आणि हॉकी या खेळांमध्ये १९५२ ला सहभागी होणारी मेरी डिसोझा ही पहिली भारतीय महिला होती.
गोव्यातून जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घेतला जात नाही. तनिषाची उपस्थिती गोवा राज्यासाठी आनंद देणारी आहे.
ऑलिंपिकचे उद्घाटन आणि सीन नदीचे पुनरुज्जीवन