Manish Jadhav
गुलाब पाणी हे एक सर्वोत्तम नॅचरल टोनर आहे. रासायनिक टोनरपेक्षा हे त्वचेसाठी पूर्णपणे सुरक्षित असून चेहऱ्यावरील धूळ आणि घाण स्वच्छ करुन त्वचेला झटपट ताजेतवाने करते.
अनेकदा साबण किंवा फेसवॉश वापरल्याने त्वचेची नैसर्गिक pH लेव्हल बिघडते. गुलाब पाण्याचा नियमित स्प्रे केल्यास त्वचेची pH लेव्हल संतुलित राहण्यास मदत होते.
चेहऱ्यावरील उघडे छिद्र (Open Pores) कमी करण्यासाठी गुलाब पाणी अत्यंत प्रभावी आहे. ते पोर्स घट्ट करुन त्वचेची पोत (Texture) सुधारण्यास मदत करते.
दिवसातून 2-3 वेळा चेहऱ्यावर गुलाब पाण्याचा स्प्रे मारल्याने त्वचेतील ओलावा टिकून राहतो. यामुळे कोरडी त्वचा मऊ, मुलायम आणि हायड्रेटेड दिसते.
गुलाब पाण्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे चेहऱ्यावरील लालसरपणा, खाज आणि पिंपल्समुळे होणारी जळजळ शांत होण्यास मदत होते.
कॉटन पॅड गुलाब पाण्यात भिजवून 10 मिनिटे डोळ्यांवर ठेवल्याने दिवसाभराचा थकवा दूर होतो आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे हळूहळू कमी होतात.
मेकअप करण्यापूर्वी आणि नंतर गुलाब पाण्याचा वापर नॅचरल सेटिंग स्प्रे म्हणून केला जाऊ शकतो. यामुळे मेकअप दीर्घकाळ टिकतो आणि चेहऱ्यावर एक छान नॅचरल ग्लो येतो.