Akshata Chhatre
केळ्याच्या साली पोटॅशियमचा मोठा स्रोत आहेत. साली उन्हात वाळवून त्याची पावडर बनवा आणि महिन्यातून दोनदा मातीत मिसळा.
या नैसर्गिक खतामुळे फुलांचा आकार दुप्पट होतो आणि रंगही गडद येतो. तुम्ही वाळलेल्या साली थेट मातीत दाबूनही ठेवू शकता.
हिवाळ्याच्या सुरुवातीला वाळलेल्या फांद्या आणि पिवळी पाने ४५ डिग्रीच्या कोनात कापून टाका. यामुळे नवीन फांद्या फुटून फुले वाढतात.
फांद्या कापल्यानंतर त्या भागावर हळद किंवा फंगीसाईड लावा. यामुळे झाडाला बुरशी लागत नाही आणि झाड निरोगी राहते.
गुलाबाच्या रोपाला दिवसातून किमान ५ ते ६ तास थेट ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवा. सावलीत ठेवल्यास झाडाची फक्त पाने वाढतील.
झाडाची माती फक्त 'ओलसर' ठेवा, खूप 'ओली' नको. सकाळी पाणी देणे सर्वोत्तम आहे, ज्यामुळे पानांवर बुरशी धरत नाही.