Romantic places in Konkan: प्रेमाचा प्रवास... कोकणच्या वाटेवर!जोडीदारासोबत एन्जॉय करा 'हे' 7 सुंदर स्पॉट्स

Sameer Amunekar

गणपतीपुळे

स्वच्छ समुद्रकिनारा, लाल माती आणि शांत वातावरण गणपतीपुळे हे कपल्ससाठी परिपूर्ण ठिकाण आहे. संध्याकाळी सूर्यास्त पाहताना समुद्रकिनारी फिरण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरतो.

Romantic places in Konkan | Dainik Gomantak

तारकर्ली

तारकर्ली हे पांढऱ्या वाळूचे स्वर्गीय बीच आहे. जोडीदारासोबत स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग किंवा बोटिंगचा आनंद घ्या. रोमँटिक वॉटर अॅक्टिव्हिटीजसाठी हे ठिकाण खास आहे.

Romantic places in Konkan | Dainik Gomantak

देवगड किनारा

देवगडचा समुद्रकिनारा शांत आणि कमी गर्दीचा आहे. जोडीदारासोबत सायंकाळी बसून समुद्राच्या लाटा पाहणं म्हणजे एक स्वप्नवत क्षण. जवळच असलेला विजयदुर्ग किल्लाही भेट देण्यासारखा आहे.

Romantic places in Konkan | Dainik Gomantak

गुहागर

गुहागर हे स्वच्छ, निसर्गरम्य आणि शांत ठिकाण आहे. शहराच्या गोंधळापासून दूर जाऊन शांत वेळ घालवू इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी हे परफेक्ट आहे.

Romantic places in Konkan | Dainik Gomantak

वेंगुर्ले

सागरी वाऱ्याचा स्पर्श, नारळाची झाडं आणि निसर्गाचं सौंदर्य. वेंगुर्लेतील सागरकिनारे रोमँटिक मूड तयार करतात. येथे डॉल्फिन पाहण्यासाठी बोट राईडही घेता येते.

Romantic places in Konkan | Dainik Gomantak

आंबोली

जर तुम्हाला डोंगर, धबधबे आणि धुक्याचं वातावरण आवडत असेल तर आंबोलीपेक्षा सुंदर ठिकाण नाही. मॉन्सूनमध्ये तर इथलं सौंदर्य अधिकच खुलतं.

Romantic places in Konkan | Dainik Gomantak

स्टायलिश लूक हवा? 'या' बेसिक टिप्सने मिळवा घनदाट केस

Hair Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा