Hair Care Tips: मुलांनो, स्टायलिश लूक हवा? 'या' बेसिक टिप्सने मिळवा मजबूत आणि घनदाट केस

Sameer Amunekar

योग्य शँपूचा वापर करा

आपल्या केसांच्या प्रकारानुसार (तेलकट, कोरडे, नॉर्मल) शँपू निवडा. सल्फेट-फ्री आणि नैसर्गिक घटक असलेले शँपू केसांच्या मुळांना पोषण देतात.

Hair Care Tips | Dainik Gomantak

आठवड्यातून किमान दोनदा तेल लावा

नारळ, बदाम किंवा अरंडीचे तेल केसांना आवश्यक पोषक घटक पुरवते. हलक्या हाताने मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते आणि केस गळती कमी होते.

Hair Care Tips | Dainik Gomantak

गरम पाणी टाळा

खूप गरम पाण्याने केस धुतल्यास नैसर्गिक तेल नष्ट होते. त्यामुळे नेहमी कोमट किंवा थंड पाण्याने केस धुवा.

Hair Care Tips | Dainik Gomantak

योग्य आहार घ्या

प्रथिने, बायोटिन, झिंक आणि व्हिटॅमिन ई यांचा आहारात समावेश करा. अंडी, सुकामेवा, हिरव्या भाज्या आणि फळे हे केसांसाठी उत्तम आहेत.

Hair Care Tips | Dainik Gomantak

वारंवार जेल आणि केमिकल्सचा वापर

जास्त प्रमाणात जेल, स्प्रे किंवा कलर वापरल्याने केस कोरडे आणि कमजोर होतात. आवश्यक तेव्हाच वापरा आणि नंतर केस नीट धुवा.

Hair Care Tips | Dainik Gomantak

तणाव कमी

ताण आणि झोपेअभावी केस गळती वाढते. नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप हेही केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

Hair Care Tips | Dainik Gomantak

हेअरकट

दर 4-6 आठवड्यांनी ट्रिमिंग केल्याने स्प्लिट एंड्स दूर होतात आणि केस नीट वाढतात.

Hair Care Tips | Dainik Gomantak

पाकिस्तानमधील किल्ले, ज्यांचा इतिहास जोडलेला आहे भारताशी

Pakistan Fort | Dainik Gomantak
येथे क्लिक करा