Romantic Rainy Destinations: पावसात भिजण्यासाठी परफेक्ट! जोडप्यांसाठी 'ही' ठिकाणं आहेत प्रेमाची स्वर्गभूमी

Sameer Amunekar

पावसाळा म्हणजे निसर्गाचा उत्सव! धुके, थेंबांचा ताल, हिरवळ आणि मंद वारा… अशा वातावरणात जोडीदारासोबत वेळ घालवण्याची मजा काही औरच. भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे पावसाळ्यात फिरणं स्वर्गासारखं जाणवतं.

Romantic Rainy Destinations | Dainik Gomantak

लोणावळा

धुक्याची चादर, गगनचुंबी डोंगर आणि हिरवाईचा साज येते पाहायला मिळते. लोणावळा पावसात प्रेमाच्या आठवणी कोरण्याचं परिपूर्ण ठिकाण आहे.

Romantic Rainy Destinations | Dainik Gomantak

चेरापूंजी

जगातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण असलेलं चेरापूंजी, हे निसर्गप्रेमी जोडप्यांसाठी स्वर्गच! धबधबे, जिवंत रूट ब्रिज आणि दाट जंगलांचं मोहक दृश्य अनुभवताना वेळ कसा जातो कळत नाही.

Romantic Rainy Destinations | Dainik Gomantak

मावळ

लोणावळ्याजवळचं मावळ हे पावसात धबधब्यांनी नटलेलं, गर्द हिरवळीत हरवलेलं गाव आहे. किल्ले आणि निसर्गाचा मिलाफ हे ठिकाण जोडप्यांसाठी खास बनवतं.

Romantic Rainy Destinations | Dainik Gomantak

कूर्ग, कर्नाटक

कॉफीच्या मळ्यांमध्ये हातात हात घालून चालणं, मळे, डोंगररांगा आणि पावसाच्या सरींमध्ये हरवलेलं सौंदर्य… कूर्ग हे थेट प्रेमाच्या कवितेतलं पान वाटतं.

Romantic Rainy Destinations | Dainik Gomantak

गोवा

पावसाळ्यातल्या गोव्याचं वेगळंच सौंदर्य असतं. गर्दी कमी, निसर्ग भरात, आणि प्रेमात रमण्यासाठी उत्तम बीच किंवा घाटमाथ्याची ठिकाणं.

Romantic Rainy Destinations | Dainik Gomantak
Famous Waterfall In Konkan | Dainik Gomantak
येथे क्लिक करा