Famous Hill Station: गोव्याहून फक्त काही तासांवर! 'या' निसर्गरम्य हिल स्टेशनची नक्की सफर करा

Sameer Amunekar

गोवा

गोव्याचा विचार करताच डोळ्यासमोर समुद्रकिनारे, पार्टी लाइफ आणि पर्यटकांची गर्दी उभी राहते. पण गोव्याच्या सीमेपासून फक्त काही तासांवर एक शांत, निसर्गरम्य ठिकाण आहे.

Famous Hill Station | Dainik Gomantak

आंबोली

गोव्याहून फक्त काही तासांच्या अंतरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसलेलं आंबोली हे हिल स्टेशन पर्यटकांसाठी एक परफेक्ट वीकेंड डेस्टिनेशन ठरत आहे.

Famous Hill Station | Dainik Gomantak

थंड हवामान

सह्याद्रीच्या रांगेत वसलेले आंबोली हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ७०० मीटर उंचीवर आहे. इथलं थंड हवामान, दाट जंगलं, धबधबे आणि पक्ष्यांचे मंजूळ आवाज मनाला वेगळाच शहारा देतात.

Famous Hill Station | Dainik Gomantak

सौंदर्य

विशेषतः पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आंबोलीचं सौंदर्य अधिक खुलून येतं.

Famous Hill Station | Dainik Gomantak

गोव्यापासून जवळ

गोव्याच्या पेडणे किंवा म्हापसा भागातून आंबोलीला पोहोचायला फक्त २ ते ३ तास लागतात. गाडीने प्रवास करताना सुंदर घाटवाटा, हिरव्यागार जंगलं आणि मधून मधून येणारे धबधबे ही एक वेगळीच अनुभूती देतात.

Famous Hill Station | Dainik Gomantak

धुक्याची चादर

आंबोली घाटातल्या वळणवळणाच्या रस्त्यांवरून प्रवास करताना दोन्ही बाजूंना पसरलेली धुक्याची चादर अनुभवायला मिळते.

Famous Hill Station | Dainik Gomantak
Chicken Eating Benefits | Dainik Gomantak
येथे क्लिक करा