‘All Eyes on Rafah’ हिट मॅनची पत्नी रितिका सजदेह अडकली वादात!

Manish Jadhav

इस्त्रायल आणि हमास युद्ध

इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अधिकच गडद होत चालले आहे. इस्त्रायल गाझासह राफाह शहरावर हवाई हल्ले करत आहे. दरम्यान, भारतीय संघांचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह सध्या चर्चेत आहे.

Israel-Hamas War | Dainik Gomantak

रितिका सजदेहची पोस्ट व्हायरल!

रितिका सध्या तिच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे चर्चेत आहे.

ritika sajdeh | dainik gomantak

राफाहवरील हल्ल्याच्या निषेधाची पोस्ट

रितिकाने राफाहवरील हल्ल्याचा निषेध करणारी पोस्ट आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरुन शेअर केली.

ritika sajdeh post | dainik gomantak

रितिकावर टिकांचा भडिमार!

रितिकाच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली. यूजर्संनी तिच्यावर टिकांचा भडिमार केला.

ritika sajdeh | dainik gomantak

रितिकाने पोस्ट हटवली

तथापि, रितिकाने त्यानंतर राफाह शहरावरील हल्ल्याची पोस्ट हटवली, परंतु शेकडो लोकांनी तिच्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला. जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ritika sajdeh | dainik gomantak

'ऑल आयज ऑन राफाह' मोहिमेला पाठिंबा दिला

रितिकाने बुधवारी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत 'ऑल आयज ऑन राफाह' मोहिमेला पाठिंबा दिला होता. या मोहिमेचा उद्देश इस्त्रायल आणि हमास यांच्या संघर्षाकडे जगाचे लक्ष वेधण्याचा आहे.

ritika sajdeh | dainik gomantak

यूजर्सची प्रतिक्रिया...

सोशल मीडियावर रितिकाला ट्रोल करताना एका व्यक्तीने लिहिले की, तु काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराबाबत का बोलत नाही? पॅलेस्टाईनबद्दल लगेच बोलते.

ritika sajdeh | dainik gomantak

यूजर्सची प्रतिक्रिया

दुसऱ्या व्यक्तीने लिहिले, "ती रोहित शर्माची पत्नी आहे... रितिका सजदेह... काश्मिरी पंडितांबद्दल कधीच बोलत नाही... पाकिस्तान आणि बांगलादेशातील हिंदूंबद्दल कधीच बोलत नाही, पण पॅलेस्टाईन आणि गाझाबद्दल खूप काळजी दाखवत आहे..."

ritika sajdeh | dainik gomantak
hardik pandya natasha stankovic divorce | dainik gomantak