Sameer Panditrao
हर्शेल गिब्स आफ्रिकेचा माजी स्टार खेळाडू आहे.
त्याचे एक वक्तव्य नुकतेच सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहे.
तो म्हणाला की विराट कोहलीपेक्षा रोहित शर्मा टेक्निकली चांगला खेळतो.
यासाठी त्याने रोहित शर्मा चौथ्या, पाचव्या स्टंपवरचे चेंडू नीट खेळत असल्याचे उदाहरण दिले.
सोबतच त्याने असे चेंडू खेळताना किंग कोहली किती वेळा आउट झाला आहे याबाबत विचार करायला सांगितले आहे.
त्याचे हे स्टेटमेंट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विराट कोहलीचे चाहते या गोष्टीमुळे नाराज झाले आहेत.