Pranali Kodre
भारत विरुद्ध इंग्लंड संघात संघात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 2 फेब्रुवारीपासून सुरू झाला.
या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
सिराजला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याचे कारण भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीनंतर स्पष्ट केले.
रोहितने रोहितने दिलेल्या माहितीनुसार सिराजचे वर्कलोड सांभाळण्यासाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे.
सिराज जवळपास ऑगस्ट-सप्टेंबर 2023 पासून सातत्याने क्रिकेट खेळत आहे. त्याचमुळे त्याला दुसऱ्या कसोटीआधी भारतीय संघातून मुक्त करण्यात आले असून विश्रांती देण्यात आली आहे.
सिराजच्या जागेवर दुसऱ्या कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मुकेश कुमारला संधी देण्यात आली आहे.
तसेच या सामन्यासाठी सिराजच्या अनुपस्थितीत भारतीय संघात आवेश खानही जोडला गेला आहे, मात्र त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आलेली नाही.
दरम्यान, केएल राहुल आणि रविंद्र जडेजा हे देखील दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाल्याने भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये केएल राहुलच्या जागेवर रजत पाटीदारला आणि जडेजाच्या जागेवर कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे.