Pranali Kodre
भारतीय महिला क्रिकेट संघाने डिसेंबर 2023 महिन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांविरुद्ध ऐतिहासिक कसोटी विजय मिळवले.
भारतीय महिला संघाच्या या यशाबद्दल भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मानेही कौतुक केले आहे.
भारतीय महिला संघाने 16 डिसेंबर रोजी इंग्लंडविरुद्ध नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम झालेल्या कसोटी सामन्यात तब्बल 347 धावांनी विजय मिळवला.महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय ठरला.
त्यानंतर भारतीय महिला संघाने 24 डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 8 विकेट्सने विजय मिळवला. हा भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी विजय ठरला.
या यशाबद्दल रोहित म्हणाला, 'त्यांना दोन्ही कसोटीत खेळताना पाहून मजा आली. त्यांनी ज्याप्रकारे कसोटी क्रिकेट खेळले, ते पाहून आनंद झाला. मी सर्वांच्या चेहऱ्यावर जिद्द बघितली आणि त्यांची देहबोलीही विजय मिळवण्यासाठी उत्सुक असलेली दिसली.'
रोहित असेही म्हणाला की महिला असो किंवा पुरुष, लोकांना कसोटी क्रिकेट पाहायला अजूनही आवडत आहे, ही चांगली गोष्ट आली.
त्याचबरोबर रोहितने असा विश्वासही व्यक्त केला की भविष्यात महिलांचे आणखी कसोटी क्रिकेट पाहायला मिळेल.