Pranali Kodre
भारतीय महिला क्रिकेट संघासाठी डिसेंबर 2023 हा महिना शानदार राहिला आहे.
याच महिन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडविरुद्ध कसोटीतील सर्वात मोठा विजय मिळवला.
त्यानंतर आता भारतीय महिला संघाने 24 डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी विजय मिळवला.
भारतीय महिला संघाने वानखेडे स्टेडियमवर 21 ते 24 डिसेंबर दरम्यान झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला 8 विकेट्सने पराभूत केले.
भारतीय महिला संघाने या सामन्यापूर्वी एकूण 10 सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात यापूर्वी झालेल्या 10 कसोटी सामन्यांपैकी 6 सामने अनिर्णित राहिले आहेत, तर 4 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले होते.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 77.4 षटकात 219 धावा केल्या. त्यानंतर भारताने पहिल्या डावात 126.3 षटकात सर्वबाद 406 धावा केल्या आणि 187 धावांची आघाडी घेतली होती.
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 105.4 षटकात 261 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे पहिल्या डावातील 187 धावांच्या पिछाडीमुळे ऑस्ट्रेलियाने भारतासमोर अवघे 75 धावांचेच आव्हान ठेवले. हे लक्ष्य भारताने 2 विकेट्सच गमावत 18.4 षटकात पूर्ण केले.
या सामन्यात भारताकडून 7 विकेट्स घेणारी स्नेह राणा सर्वोत्तम खेळाडू ठरली.