Akshata Chhatre
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचा आज वाढदिवस. देशात हिटमॅन शर्माच्या चाहत्यांची कमी नाही, पण तुम्ही कधी विचार केला का रोहित शर्माचा हिटमॅन नक्की झाला तरी कसा?
२०१३ मध्ये धोनीने रोहितला सांगितलं, “तू ओपनिंग कर. तुझ्या खेळाला ते शोभून दिसते.” आणि इथून रोहित शर्माच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरु झाला.
रोहित शर्माने त्याच्या पहिल्याच ODI ओपनिंगमध्ये धुवाधार बॅटिंग केली होती. इंग्लंडविरुद्ध त्याने ९३ चेंडूंमध्ये ८३ धावा केल्या होत्या आणि भारताने २५८ धावांचं लक्ष्य गाठलं होतं.
यावेळी रोहित शर्माने ५ सामन्यांत १७७ धावा केल्या होत्या. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात साऊथ आफ्रिका विरुद्ध ८१ चेंडूंमध्ये ६५ करत रोहितने स्वतःची ओळख निर्माण करायला सुरुवात केली होती.
"धोनीने मला अपयशाची भीती न बाळगता काम करायला शिकवलं" त्याच्यासारखा कर्णधार पुन्हा होणार नाही असं रोहित स्वतः म्हणाला होता.
आज रोहित शर्माने विश्वविक्रम स्वतःच्या नवी केले आहेत. बॉलर म्हणून भारतीय संघात पदार्पण केलेला रोहित आज ओपनिंगचा बादशाह आहे.