Pranali Kodre
भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात बंगळुरुमध्ये 17 जानेवारी 2024 रोजी टी20 सामना पार पडला.
या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने 69 चेंडूत 121 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 8 षटकार मारले.
रोहितचे हे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील पाचवे शतक आहे.
त्यामुळे रोहित आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 5 शतके करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
इतकेच नाही, तर कर्णधार म्हणून रोहितचे हे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील तिसरे शतक आहे.
त्याचमुळे त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत अव्वल क्रमांकावरील बाबर आझमची बरोबरी केली आहे.
बाबर आझमनेही आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये नेतृत्व करताना तीन शतके केली आहे.