Pranali Kodre
भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील चौथा सामना रांचीमध्ये 23 ते 27 फेब्रुवारी 2024 दरम्यान खेळला गेला.
चौथ्या सामन्यादरम्यान भारचाचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी कारकिर्दीत एक महत्त्वाचा टप्पा पार केला.
रांची कसोटीत रोहितला पहिल्या डावात 2 धावाच करता आल्या होत्या, परंतु दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवस अखेरपर्यंत त्याने नाबाद 24 धावा केल्या आहेत.
त्यामुळे त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 4000 धावा पूर्ण करण्याचा टप्पा पूर्ण केला आहे.
कसोटीमध्ये 4000 धावा पूर्ण करणारा तो भारताचा 17 वा खेळाडू आहे.
रोहितने या 4000 धावा 58 कसोटी सामन्यांतील 100 व्या डावात खेळताना पूर्ण केल्या आहेत.
रोहितने या 4000 कसोटी धावा पूर्ण करताना 11 शतके आणि 16 अर्धशतके केली आहेत.