भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळणाऱ्या इंग्लिश गोलंदाजाला करावी लागणार सर्जरी

Pranali Kodre

भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड संघात 25 जानेवारी ते 11 मार्च 2024 दरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे.

Jack Leach | X/ICC

इंग्लंडच्या गोलंदाजावर शस्त्रक्रिया

ही मालिका सुरू असतानाच इंग्लंडचा अनुभवी फिरकीपटू जॅक लीचला इंग्लंडमध्ये त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून घ्यावी लागणार आहे.

Jack Leach | X/englandcricket

पहिल्या सामन्यात दुखापत

लीग या मालिकेचा भाग होता. मात्र हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्यात सामन्यादरम्यान पहिल्याच दिवशी त्याला दुखापत झाली.

Jack Leach | X/ICC

दुखापतीनंतरही गोलंदाजी

दरम्याने दुखापतीनंतरही त्याने त्या सामन्यात छोट्या छोट्या स्पेलमध्ये गोलंदाजी करत इंग्लंडच्या 28 धावांनी मिळवलेल्या विजयात त्याने योगदान दिले होते.

Jack Leach | X/ICC

दोन विकेट्स

त्याने हैदराबाद कसोटीत दोन विकेट्स घेतल्या होत्या. त्याने पहिल्या डावात रोहित शर्मा आणि दुसऱ्या डावात श्रेयस अय्यर यांना बाद केले होते.

Jack Leach | X/ICC

शस्त्रक्रिया

लीचनेच माहिती दिली आहे की त्याला आता त्याच्या डाव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आता तो या दुखापतीतून लवकर सावरावा अशा आशा इंग्लंडला असेल.

Jack Leach | X/ICC

कसोटी सामने अन् विकेट्स

लीचने आत्तापर्यंत 36 कसोटी सामने खेळले असून 126 विकेट्स घेतल्या आहेत.

Jack Leach - Joe Root | X/ICC

T20I Series: ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडला त्यांच्याच मायदेशात व्हाइटवॉश

Australia Cricket Team | X/ICC