Manish Jadhav
टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावून टीम इंडियाला चॅम्पियन बनवले.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात केलेल्या शानदार कामगिरीबद्दल भारतीय कर्णधाराला आता मोठे बक्षीस मिळाले आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत रोहितने मोठी झेप घेतली.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्यात 76 धावांची शानदार खेळी खेळणाऱ्या रोहितने आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत मोठी झेप घेतली. रोहित क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. रोहितचे सध्या 756 रेटिंग पॉइंट आहेत.
भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल अव्वल स्थानी कायम आहे. त्याचे 784 रेटिंग पॉइंट आहेत. तर पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम दुसऱ्या क्रमांकावर आहे.
भारताच्या 4 फलंदाजांचा टॉप-10 फलंदाजांच्या क्रमवारीत समावेश आहे. भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल 16व्या स्थानी पोहोचला.