Pranali Kodre
भारत विरुद्ध इंग्लंड संघात 15 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये सुरू झाला आहे.
या सामन्यात भारताकडून कर्णधार रोहित शर्माने शतकी खेळी केली आहे. रोहितने 196 चेंडूत 14 चौकार आणि 3 षटकारांसह 131 धावा केल्या आहेत.
त्यामुळे आता रोहित कसोटी क्रिकेटमध्ये शतक करणारा भारताचा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे.
रोहितने राजकोट कसोटीत शतक केले, त्यावेळी त्याचे वय 36 वर्षे 291 दिवस इतके होते.
त्यामुळे रोहितने विजय हजारे यांच्या विक्रमाला मागे टाकले.त्यांनी 1951 साली 36 वर्षे 278 इतके वय असताना इंग्लंडविरुद्ध नेतृत्व करताना शतक केले होते.
विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये शतक करणाऱ्या सर्वात वयस्कर भारतीय कर्णधारांच्या यादीत हजारे यांच्या नाव तिसऱ्या क्रमांकावरही आहे, तर रोहितचे नाव चौथ्या क्रमांकावरही आहे.
हजारे यांनी 1951 सालीच इंग्लंडविरुद्ध नेतृत्व करताना 36 वर्षे 236 दिवस वय असतानाही शतक केले होते.
तसेच रोहितने वेस्ट इंडिजविरुद्ध 36 वर्षे 73 दिवस वय असताना 2023 मध्ये कसोटीत शतक ठोकले होते.
या यादीत पाचव्या क्रमांकावर मोहम्मद अझरुद्दीन आहे. त्यांनी 35 वर्षे 321 दिवस वय असताना न्यूझीलंडविरुद्ध कर्णधार म्हणून खेळताना शतक केले होते.