Pranali Kodre
भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात 14 जानेवारी 2024 रोजी इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर टी20 मालिकेतील दुसरा सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला.
हा सामना रोहित शर्मासाठी खास ठरला. हा रोहित शर्माचा कारकिर्दीतील 150 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना होता.
त्यामुळे 150 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणारा तो जगातील पहिलाच पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट सामने खेळण्याच्या यादीत रोहित पाठोपाठ आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग आहे. स्टर्लिंगने 134 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.
दरम्यान रोहित शिवाय चार महिला क्रिकेटपटूंनी 150 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. (14 जानेवारी पर्यंत)
महिलांमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळण्याचा विक्रम भारताच्याच हरमनप्रीत कौरच्या नावावर आहे. तिने 161 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.
हरमनप्रीतच्या पाठोपाठ सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटूंमध्ये सुझी बेट्स (152), डॅनिएल वॅट (151) आणि एलिसा हेली (150) यांचा क्रमांक लागतो.