गोमन्तक डिजिटल टीम
आजपासून गोव्यात रोड सेफ्टीचा आठवडा सुरु झाला आहे. दिनांक 14 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर पर्यंत रोड सेफ्टीचा आठवडा साजरा केला जाईल.
राज्यातील पंचायत आणि नगरपालिकांना हा आठवडा साजरा करण्यासाठी आणि रोड सेफ्टीचे महत्व पटवून देणारे कार्यक्रम घडवून आणण्यासाठी 10 हजार रुपये देण्यात आलेत.
गोवा हे राज्य छोटं असलं तरीही रस्त्यांची अवस्था हा वाढत्या अपघातांमधला प्रमुख घटक ठरलाय.
शिवाय दारू पिऊन गाडी चालविल्याने अपघात होत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
इतर अनेकवेळा भिवपाची गरज ना, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी देखील आता भिवपाची गरज असा असे म्हणत गोव्यातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी स्थानिकांना काही सूचना दिल्या.
रस्ते अपघातात सरासरी एका व्यक्तीचा मृत्यू तर साधारण 10 लोक जखमी होत आहेत, आणि यावर लवकरच निर्बंध लागला पाहिजे.
अपघात रोखणे ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. दारू न पिता गाडी चालवणे, हेल्मेट किंवा सीटबेल्टचा वापर करणे, ट्राफिक नियमांचे पालन करणे अशा अनेक गोष्टींचे पालन करून आपण एक जबाबदार नागरिक नक्कीच बनू शकतो.