गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यात जाण्याचा विचार करताय आणि गोवा कसा फिरावं म्हणून विचारात अडकलाय?
गोव्यात बसची सेवा उपलब्ध असली तरीही स्वतःच्या हातात गाडी असेल तर अनेक ठिकाणांना भेट देता येते. गोव्यात एखादी टू व्हीलर घेऊन फिरायचा विचार केल्यास हा एक उत्तम मार्ग ठरू शकतो आणि म्हणूनच या गाड्यांचे दर जाणून घेऊया...
ऍक्टिव्हा सारखी गाडी घेऊन फिरायच्या विचारात असाल तर साधारणपणे ४०० रुपये एका दिवसासाठी असा दर लावला जाईल.
मात्र यापेक्षा वेगळ्या स्कुटरचा विचार करत असाल तर फॅसिनो आणि ज्युपिटर ५०० रुपयांपर्यंत जाते.
गोव्यात स्कुटरशिवाय काही ऍडव्हेंचर गाड्या देखील भाड्याने विकत घेता येतात, ज्यांची किंमत १,२०० ते १,५०० पर्यंत जाऊ शकते. गोव्यात गाडी भाड्याने घेण्याआधी पेट्रोलचे दर तपासून पहा.
गोवा हे राज्य पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे पर्यटकांच्या गर्दीत गाड्यांच्या किमती प्रचंड वाढतात. या सर्व घटकांचा विचार करूनच गोव्यात गाडी भाड्याने घेण्याचा विचार करावा.