Akshata Chhatre
प्राचीन काळात, गोव्याच्या दक्षिणेकडील टेकड्यांमध्ये एक जंगल होतं, ज्याला ‘ऋषिवन’, म्हणजेच "संतांचा वन" असं म्हटलं जायचं.
ही जागा तपस्वी, ऋषी, साधूंची आवडती भूमी मानली जायची. इथेच त्यांनी त्यांचे आश्रम व तपोभूमी उभारली होती.
आज ज्या गावाला आपण रिवण म्हणून ओळखतो, त्याचं मूळ नाव ‘ऋषिवन’ असं होतं.
या गावातील बौद्ध गुन्हा ७व्या शतकातल्या बांधल्या गेल्या. संशोधकांच्या मते, या गुन्हांमध्ये बौद्ध भिक्षूंनी ध्यान केलं असावं.
संस्कृत ही त्या काळात ज्ञानाची, अध्यात्माची आणि संवादाची भाषा होती. ऋषिवनामध्ये देखील याच भाषेचा वापर केला जायचा.
ही जागा होती ध्यान, साधना, आणि आत्मज्ञानाची. आजही इथं पावलोपावली ती शांतता अनुभवायला मिळते.