Sameer Panditrao
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा शास्त्रोक्त आणि दिमाखदार पद्धतीने झाला होता.
या मंगल सोहळ्यासाठी पवित्र नद्यांचे पाणी अभिषेकासाठी आणले होते.
गंगा, यमुना, नर्मदा, कावेरी, ब्रह्मपुत्रा, कृष्णा आणि गोदावरी या त्या नद्या होत.
शिवाय समुद्राचे पाणीही आणले होते.
याव्यतिरिक्त काही पवित्र तीर्थांचे जलही आणले गेले होते.
सोने, चांदी आणि पंचधातूच्या कलशात हे पाणी होते.
अष्टप्रधान मंडळीनी महाराजांचा अभिषेक केला.