Rishabh Pant: पंतची रेकॉर्डतोड फिफ्टी; अशी कामगिरी करणारा बनला जगातील तिसरा खेळाडू

Manish Jadhav

ऋषभ पंत

टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो कसोटी फॉरमॅटमध्येही विस्फोटक फलंदाजी करतो.

Rishabh Pant | Dainik Gomantak

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी

असेच काहीसे सिडनीच्या मैदानावर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या शेवटच्या सामन्यात पाहायला मिळाले. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने धडाकेबाज अर्धशतक झळकावले.

Rishabh Pant | Dainik Gomantak

आतिषबाजी

आपल्या शानदार खेळीदरम्यान ऋषभने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्याने कांगारु गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. यादरम्यान त्याने एक खास विक्रमही आपल्या नावावर केला.

Rishabh Pant | Dainik Gomantak

अफलातून खेळी

ऋषभने या सामन्यात 33 चेंडूत 184.84 च्या स्ट्राईक रेटने 61 धावा ठोकल्या. या खेळीत त्याच्या बॅटमधून 6 चौकार आणि 4 अफलातून षटकार आले.

Rishabh Pant | Dainik Gomantak

विक्रम

या खेळीत त्याने अवघ्या 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. भारतीय क्रिकेटच्या कसोटी इतिहासातील हे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. त्याचबरोबर सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रमही ऋषभ पंतच्या नावावर आहे.

Rishabh Pant | Dainik Gomantak

यापूर्वी

यापूर्वी ऋषभनेच 28 चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला होता. 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने हा पराक्रम केला होता.

Rishabh Pant | Dainik Gomantak

जगातील तिसरा खेळाडू

याशिवाय, कसोटी क्रिकेटमध्ये 150+ च्या स्ट्राइक रेटने दोनदा अर्धशतक झळकावणारा तो जगातील तिसरा फलंदाज बनला. याआधी केवळ विव्ह रिचर्ड्स आणि बेन स्टोक्स हेच अशी कामगिरी करु शकले आहेत.

Rishabh Pant | Dainik Gomantak
आणखी बघा